येवली येथे जंत निर्मुलन व वंधत्व तपासणी शिबीर

249

The गडविश्व
गडचिरोली, १४ ऑगस्ट : तालुक्यातील येवली येथे ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त पशु संवर्धन विभागाच्या वतीने कृती शिबीर जंत निर्मुलन व वंधत्व तपासणी शिबीर १० ऑगस्ट रोजी पार पडले. तर ११ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण व १२ ऑगस्ट रोजी सकस आहार म्हणून अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना अंडी वाटप करण्यात आली.
यावेळी गावातील नागरिकांनी आपली जनावरे कृती शिबीर जंत निर्मुलन व वंधत्व तपासणी शिबीरात तपासणी करीता आणली होती.
यावेळी डॉ. चेतन नंदनवार, जुमनाके, सरपंच युवराज भांडेकर, सदस्य चोखाजी बांबोडे, बंडू खोब्रागडे तसेच पशुपालक उपस्थित होते. गावातील नागरिकांनी सदर शिबीराला उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here