The गडविश्व
गडचिरोली : रब्बी पिकाची सुधारीत पैसेवारी तहसिलदार यांचेकडून प्राप्त माहितीचे आधारे संकलीत करुन गडचिरोली जिल्ह्याची सन 2021-2022 या वर्षाची रब्बी पिकाची सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण 1689 गावे असून रब्बी पिकाची गावे 148 आहेत. त्यापैकी रब्बी गावामध्ये पीके नसलेली गांवे 76 आहेत. सदर रब्बी पिक असलेल्या गावापैकी 50 पैशाचे आत पैसेवारी असलेले रब्बी गावे 0 असून 50 पैशाचे वर पैसेवारी असलेल्या एकूण रब्बी पिक असलेल्या गावांची संख्या 72 आहेत. अशा प्रकारे एकूण 72 रब्बी पिक असलेल्या गावाची पैसेवारी जाहीर केलेली आहे. गडचिरोली जिल्ह्याची रब्बी हंगाम 2021-2022 या वर्षाची हंगामी पैसेवारी ही 0.64 आहे. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.