The गडविश्व
नवी दिल्ली : रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठा झापोरिझ्झिया अणुऊर्जाप्रकल्प शुक्रवारी ताब्यात घेतला. हा युरोपातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. आता रशियाने युक्रेन दरम्यान सुरू असलेले युद्ध मानवतेसाठी काही तासांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाकडून तात्पूरती युद्धविरामची घोषणा करण्यात आली आहे. परंतू युद्ध फक्त दोन शहरांसाठीच थांबवण्यात आले आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी युद्धविराम जाहीर केल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे.
नुकतेच रशियाने वेगळे देश म्हणून मान्यता दिलेल्या डोनेत्स्कमधील मारियोपोल आणि वाल्नोवाखा या शहरामध्ये काही तासांसाठी युद्धविराम जाहीर केली आहे.