The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ५ ऑगस्ट : रांगी केद्रांची चालू सत्राची पहिली शैक्षणिक शिक्षण परिषद काल गुरुवार ४ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा रांगी येथे पार पडली.
धानोरा पंचायत समिति अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२२-२३ मधील रांगी केंद्राची प्रथम शिक्षण परिषद गटशिक्षणाधिकारी आरवली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात गटचर्चा, थीम घेऊन चार भिंतीच्या बाहेर मोकळ्या वातावरणात परिषद पार पडली. गटशिक्षणाधिकारी आरवली यांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. फुलोरा पाठ मराठी व गणित यांचे सादरीकरण अनुक्रमे रांगी शाळेतील शिक्षक जांगी व दोडके यांनी घेतले. विस्तार अधिकारी आखाडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सहारे सर यांनी Read to me व विद्यांजली उपक्रमाबाबत गटचर्चेतून माहिती दिली. चांदेकर यांनी कृतीद्वारा सुरवात करुन अपंग समावेशीत शिक्षण ही तासिका घेतली. दुगा व मा मडावी यांनी नव्याने आलेल्या शैक्षणिक उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. अशाप्रकारे शिक्षण परिषद यशस्वीरीत्या संपन्न झाली.