– रांगी येथे सेवा पंधरवडा व समाज जागृती मेळावा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २९ सप्टेंबर : जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागात वसलेल्या लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिस विभागाच्या माध्यमातून पोलिस दादालोरा खिडकी योजना सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत अनेकांना विविध योजना, दाखले व प्रमाणपत्रांचा लाभ देण्यात आला आहे. सर्वांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनस्तर उंचवावे, असे आवाहन धानोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देडे यांनी केले. ते रांगी येथे आयोजित सेवा पंधरवाडा व समाज जागृती कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते.
धानोरा तालुक्यातील रांगी येथे ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीच्या संयुक्त विद्यमाने सेवा पंधरवडा व समाज जनजागृती मेळाव्याचे आयोजन बुधवार २८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रांगी येथील प्रथम नागरीक सौ. फालेश्वरी प्रदिप गेडाम होत्या, प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे धानोरा तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे, उपसरपंच नूरज हलामी, सौ.ज्योतीताई साळवे, ग्रा.प.सदस्य दिनेश चापले, राकेश कोराम, अर्चना मेश्राम, विद्या सपाट, सचिव पी. एस.बुराडे, माजी सरपंच जगदिश कन्नाके, माजी उपसरपंच नरेद्र भुरसे, प्रा.झोळे, गभणे सहाय्यक शिक्षक, रामटेके , तंटामुक्त समिति अध्यक्ष तुळशिराम भुरसे आदी मान्यवर उपस्थित होते. येथील कार्यक्रमात गावातील नागरिकांना बुस्टर डोज देण्यात आले तसेच स्वच्छते बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंटामुक्त समिति सचिव तथा पोलिस पाटील रामचंद्र काटेंगे, संचालन नितीन कावळे तर आभार परशुराम यांनी मानले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.