– महिला बचत गटाची मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा : तालुक्यातील अतिशय महत्त्वपुर्ण असलेल्या रांगी गावात पोलिस मदत केंद्र सुरू करण्याची मागणी येथिल बचत गटातील महिलांनी धानोरा येथिल पोलिस निरिक्षक यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. धानोरा मुख्यालयापासुन १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात गेल्या चार पाच वर्षापासून पोलीस मदत केंद्र मंजूर झालेले आहे. पोलीस मदत केंद्र साठी जागा सुद्धा निश्चित करण्यात आली असून अजूनही पोलीस मदत केंद्र सुरू केलेले नाही. महिला दारुबंदी संघटनेच्यावतीने रांगी येथे दारूबंदी मोहीम सुरू आहे. पण अट्टल दारू विक्रेते असुन ते महीलांना जुमानत नाही. गावात अवैध धंदे राजरोस पणे सुरु आहेत. गावात पोलिस मदत केंद्र नसल्याने रात्री अवैध धंदे सुरू ठेवतात. गावात राजरोसपणे जुगार खेळले जाते, दारू पिऊन दारुडे लोक महिलांना खूप त्रास देतात. जर रांगीला पोलीस मदत केंद्र झाले तर अवैध धंद्यांना आळा बसेल, महीलांना सुरक्षा मिळेल, महिलांचा आत्मविश्वास जागा होईल आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून सहज रोजगाराकडे वळतील . घर कुटुंब व गावात शांतता नांदेल आणि खऱ्या अर्थाने गावातील तरुण व महिला विकासाच्या दिशेने वाटचाल करतील गाव शांत सुव्यवस्थित राहील. तसेच रांगी परिसर मोठा असुन परिसरात अनेक लहान मोठी गावे असल्याने या सर्वच गावाना पोलिसाचा धाक , दरारा राहिल. नियंत्रण प्रस्थापित होईल . या आधी सुद्धा पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली यांना निवेदने दिलेली आहे असे महिला गटाचे म्हणणेआहे. तरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गावातील लोकांचा विचार करू रांगी येथे पोलीस मदत केंद्र सुरु करावे अशी मागणी रांगीतील महिला बचत गट यांनी धानोराचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे.