– पूरग्रस्त भागाचा करणार दौरा
The गडविश्व
गडचिरोली, २२ जुलै : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून अतिवृष्टी सुरू असल्याने जिल्ह्यातील अनेक गावे, शेती, शेतकरी, लोकांचे नुकसान झाले असून त्याची पाहणी करण्याकरिता राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आ.विजय वडेट्टीवार पुढील दोन दिवस २३ व २४ जुलै रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. जिल्ह्यातील दक्षिण भागात गेल्या काही दिवसामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. याच पूरग्रस्त भागाचा दौरा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आ.विजय वडेट्टीवार हे करणार असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शनिवार २३ जुलै २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता गडचिरोली येथील रानफुल निवासी पत्रकार परिषद, सकाळी ९.३० वाजता गडचिरोली येथून अहेरी कडे प्रयाण करतील. सकाळी ११.३० वाजता अहेरी येथे आगमन व शासकीय विश्रामगृह आलापल्ली येथे ग्रामीण काँग्रेस पदाधिकारी तसेच महिला काँग्रेस पदाधिकारी तथा प्रमुख अधिकाऱ्यां समवेत तालुक्यातील पूर परिस्थितीमुळे झालेले शेतीचे नुकसान व पूरग्रस्त भागाची पाहणी व चर्चा.
दुपारी १.०० वाजता अहेरी वरून कागजनगर मार्गे सिरोंच्या जि. गडचिरोली कडे प्रयाण, सायंकाळी ४.०० वाजता सिरोंचा येथे आगमन व तालुक्यातील पूर परिस्थितीमुळे झालेलय शेतीचे नुकसान व पूरग्रस्त भागाची पाहणी करतील. सायंकाळी ६.०० वाजता सिरोंचा जि. गडचिरोली येथे आगमन व मुक्काम.
रविवार २४ जुलै २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता ग्रामीण जिल्हा व महिला काँग्रेस पदाधिकारी च्या वतीने सिरोंचा तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य कीट व ब्लॅंकेटचे वाटप, दुपारी १२.०० वाजता सिरोंचा वरून चामोर्शी जि. गडचिरोली कडे प्रयाण, दुपारी ३.३० वाजता चामोर्शी जि. गडचिरोली येथे आगमन व राखीव, सायंकाळी ४.०० वाजता चामोर्शी तालुक्यात अतिवृष्टीमुळे घरांची झालेली पडझड व पूर परिस्थितीमुळे झालेले शेतीचे नुकसान तसेच पूरपरिस्थिती संदर्भात ग्रामीण काँग्रेस पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांच्याशी चर्चा, सायंकाळी ६.०० वाजता चामोर्शी येथून गडचिरोली कडे प्रयाण, सायंकाळी ७.०० वाजता गडचिरोली येथे आगमन व ” रानफुल ‘ निवास गडचिरोली येथे मुक्काम.