The गडविश्व
मुंबई : महाराष्ट्रातील कोळसा टंचाईमुळे वीज निर्मितीवर गंभीर परिणाम झाला आहे. त्याची केंद्रीय कोळसा मंत्रालयाने दखल घेतली आहे. १ एप्रिल पासून कोल इंडियाकडून महाराष्ट्रातील औष्णिक वीज प्रकल्पांना दररोज 2 लाख 76 हजार मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा केला जात आहे, तर महानिर्मितीला सुमारे 1 लाख 32 हजार मेट्रिक टन कोळसा पुरवला जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यातील तापमानाचा पारा वाढल्याने विजेची मागणी वाढली आहे. असे असताना कोळसा टंचाईमुळे वीज निर्मितीत घट झाल्याने भारनियमन करावे लागत आहे. त्यामुळे केंद्रीय कोळसा मंत्रालयाने महाराष्ट्रातील वीज प्रकल्पांना पुरवल्या जाणाऱ्या कोळशाची माहिती जाहीर केली आहे. मार्च महिन्यात महाराष्ट्रातील वीज प्रकल्पांना दररोज 2 लाख 14 हजार मेट्रिक टन कोळसा पुरवला जात होता, त्यामध्ये 2 लाख 76 हजार मेट्रिक टनापर्यंत वाढ केली आहे. तर मार्चमध्ये महानिर्मितीला दररोज 96 लाख मेट्रिक टन कोळसा दिला जात होता, तो आता 1 लाख 32 हजारापर्यंत वाढवला आहे. महानिर्मितीकडे 2390 कोटी रुपये थकीत आहे. राज्याच्या कोळशाच्या दैनंदिन मागणीसाठी पुरवला जाणारा कोळसा पुरेसा असल्याचेही कोळसा मंत्रालयाने म्हटले आहे.