राज्यातील शाळा सुरु होणार ? इंग्रजी शाळा सुरु करण्यावर ‘मेस्टा’ ठाम

314

– राज्यात मेस्टाशी संबंधित 18 हजार शाळा

The गडविश्व
मुंबई : राज्यात इंग्रजी शाळा विरूद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटला आहे. महाराष्ट्रात ‘मेस्टा’ संघटनेशी संलग्न शाळांनी शाळा सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. मेस्टाशी संबंधित 18 हजार शाळा राज्यात आहेत. त्यातील अनेक शाळांनी शाळा सुरू करण्याबाबत तयारी दर्शवली आहे.
ग्रामीण भागातील पहिली ते बारावी आणि शहरी भागातील मुंबई वगळता इतर ठिकाणी आठवी ते बारावी शाळा सुरू करण्याची ‘मेस्टा’ या संघटनेने तयारी दर्शवली आहे. दरम्यान पालकांनीही घरी राहून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून शाळा सुरु करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. मात्र राज्य सरकारने शाळा सुरू करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही.
एकीकडे इंग्रजी शाळा सुरू करण्यावर मेस्टा ठाम आहे तर दुसरीकडे इतर शाळाही कधी सुरू होणार यावरून खल सुरू आहेत. शाळांबाबत मुख्यमंत्री 4 ते 5 दिवसांत सीएम निर्णय घेतील असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले हे खरे असले तरी कोरोना काळात विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here