-पुणे येथे केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान
The गडविश्व
सावली : जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार २०२२ वितरण सोहळा ७ मार्च रोजी पुणे येथे पार पडला. राज्यातील ५ पंचायत समिती सभापतींमध्ये सावलीचे सभापती विजय कोरेवार यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला विकासाच्या प्रक्रियेत नेताना ग्रामपंचायतीसोबतच जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या कामगिरीची नोंद व्हावी याकरीता असोसिएशनचे वतीने प्रथमच अशा पुरस्काराची निवड करण्यात आली.
संपूर्ण राज्यातून विशेष कामगिरी करणाऱ्या ५ पंचायत समिती सभापतीना पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांनी कोरोना काळात रक्तदान शिबिर, विलगिकरणातील मजुरांची काळजी, लसीकरण करण्यासाठी प्रयत्न, रोहयो कामे दर्जेदार कामे करण्यासाठी प्रयत्न व शाळा सुरू करण्यासाठी केलेले विशेष प्रयत्न व इतर कार्यात केलेली कामगिरीमुळे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला. ७ मार्च रोजी पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष उदय बने उपस्थित होते. पुरस्कार आई विस्तारीबाई कोरेवार, अर्धांगिनी वैशाली कोरेवार, मानसी कोरेवार, सहकारी नरेंद्र राचेवार, राकेश काळेवार यांचेसह स्वीकारले.