– आरोग्य यंत्रणा सतर्क
The गडविश्व
कोल्हापूर, २१ जुलै : राज्यात कोरोनाची (corona) लाट ओसरली असतांनाच आता नवे संकट उभे ठाकले आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा ( swine flu) शिरकाव झाला असून जिल्ह्यातील पाचगाव येथील एका महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मालूताई कांबळे (६६ ) असे मृतक महिलेचे नाव आहे
राज्य कोरोनातून हळू हळू सावरत असतांनाच ऐन पावसाळ्यात आता मंकीफॉक्स आणि स्वाईन फ्लूचे दुहेरी संकट ओढावले आहे. राज्यभरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोल्हापूरमध्ये स्वाईन फ्लूने शिरकाव केला असून पाचगाव येथील एका महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. १५ जुलै रोजी या महिलेची चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मागील आठवड्यभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर संपूर्ण जिल्ह्यात सहा रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. स्वाईन फ्लूने महिलेचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. सर्व नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शासकीय रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहे.
तर मुंबमध्येही पावसाळ्यात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. शहरात स्वाईन फ्लू (Swine Flu) च्या रुग्णामध्ये वाढ होताना दिसत आहे. मुंबईत चार जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शहरात स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढत चालला असल्याने ज्यांचा कोरोना चाचणी निगेटिव्ह येत आहे अशा नागरिकांची एच १ एन १ चाचणी करावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.