The गडविश्व
गडचिरोली : उद्यापासून कणकवली (सिंधुदुर्ग) येथे सुरू होणाऱ्या १८व्या युथ मुली व ८० व्या युथ मुलांच्या राज्य स्तरीय अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत गडचिरोली बॉक्सिंग केंद्राचे दोन खेळाडूंची निवड झाली आहे.
यात मुलांन मध्ये ७१ किलो वजन गटात लकी चंद्रकांत साखरे, तर मुलीनं मध्ये ४८ किलो वजन गटात कल्याणी दुधराम महागणकार यांची निवड करण्यात आली.
सदर स्पर्धा उद्या २२ जून पासून २८ जून पर्यंत आयोजित आहे.
तसेच जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील क्रीडा शिक्षक संतोष गैनवार यांची या स्पर्धेसाठी पंच अधिकारी म्हणून राज्य संघटने कडून निवड झाली आहे.
सदर खेडाळूंच्या पुढील वाटचालीसाठी गडचिरोली बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जगदीश मस्के, सचिव यशवंत कुरुडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत धोंडल, कुस्ती प्रशिक्षक बडगेलवार, रोहित विष्णोई, राजेश पद्मगिरवार, राकेश कोहपरे यांनी शुभेच्छा दिल्या.
सदर खेळाडू गडचिरोली जिल्हा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे नियमित खेळाडू असून त्यांना बॉक्सिंग प्रशिक्षक महेश निलेकार, पंकज मडावी, संतोष गैनवार, निखिल इंगडे यांचे मार्गदर्शनात प्रशिक्षण सुरू आहे. प्रवीण मेश्राम, संजय मानकर, पारस राऊत, अक्षय कोवासे, दीपक खरवडे तसेच गडचिरोली बॉक्सिंग परिवाराने स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.