The गडविश्व
ता.प्र / धानोरा : तालुक्यातील लेखा येथिल राधेश्याम बाबा सेवा समिची नुकतीच नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यावेळी समितीच्या अध्यक्षपदी विनोद लेनगुरे यांची निवड करण्यात आली आहे.
२८ मे रोजी राधेश्याम बाबा सेवा समितीची सभा आयोजीत करण्यात आली होती.सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करून जमा खर्चाचा आढावा घेण्यात आला. व सदर सभेमध्ये राधेश्याम बाबा सेवा समितीचा कालावधी पाच वर्षे पूर्ण झाल्याने नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. नानाजी तुपट यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये समितीचे नवीन अध्यक्ष म्हणून माजी जि.प. सदस्य विनोद लेनगुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर सचिवपदी सुरेश उसेंडी, उपाध्यक्षपदी बाबुराव उईके, कोषाध्यक्ष मधुकर रामपूरकर, सहसचिव रामचंद्र राऊत यांनी निवड करण्यात आली.
या सभेला श्री नानाजी तुपत ,रवींद्र पाटील झंजाड ,राखडे महाराज, गंगाधरजी पाल, आमले वार, नामदेव तोफा, सूनीलजी गडपायले , वासुदेव लेंगूरे, जगदीशजी राऊत , सुधीर जी झंझाड, केवट राम जेंघटे , महेशजी चीमुरकर, बगमरेजी, बुराडेजी महाराज, दिवदास ठाकरे यासह सभेला बाहेर गावावरून आलेले सभासद व भक्त मंडळी उपस्थित होते. नवनियुक्त कार्यकारणीचे स्वागत करण्यात आले.