राष्ट्रपती निवडणूक : एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय

899

– राष्ट्रपतीपदावर पहिली आदिवासी महिला विराजमान
The गडविश्व
नवी दिल्ली , २१ जुलै : भारताच्या राष्ट्रपतीपदी (Presidential Election 2022) एनडीएच्या द्रौपदी मुर्मू (Draupdi Murmu) यांचा विजय झाला आहे. द्रौपदी यांच्या रूपाने देशाला पहिली आदिवासी समुदायातील व्यक्ती राष्ट्रपती म्हणून लाभली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांसाठी सोमवार १८ जुलै रोजी मतदान पार पडले. अखेर त्याचा आज निर्णय लागला आहे. (draupadi murmu elected as the 15th president of india)
आज मतमोजणी करण्यात आली यात द्रौपदी मृर्मू यांचा विजय झाला आहे. त्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती झाल्या आहेत. द्रौपदी मुर्मू या २४ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल २४ जुलै रोजी समाप्त होणार आहे.
त्यांच्या विजयाने देशासह अनेक भागात जल्लोष पाहायला मिळत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मृर्मू यांच्या घराबाहेरही जोरदार जल्लोष करण्यात आला. मुंबईत भाजप कार्यालयाबाहेरही कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला तर नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
भाजपप्रणित एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षांच्या वतीने यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) हे दोन उमेदवार रिंगणात होते. द्रौपदी मुर्मू यांचे या निवडणुकीत पारडे जड असल्याचे मत याआधीच राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केले होते.
भारताच्या १५ व्या राष्ट्रपती पदासाठी ८ जुलैला निवडणुक पार पडली. या निवडणुकीत एकुण ४ हजार ८०० खासदार आणि आमदारांनी मतदानात सहभाग घेतला. द्रौपदी मुर्मू यांना २७ पक्षांचा पाठिंबा होता. तर यशवंत सिन्हा यांना १४ पक्षांचे समर्थन होते.
पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती
देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेली नव्हती. मात्र द्रौपदी यांच्या रूपाने देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here