राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून ८४ प्रलंबित आणि ८४७ दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली

570

– दोन कोटीचा दंड वसुल
The गडविश्व
गडचिरोली, १५ ऑगस्ट : भारत देशातील संपुर्ण न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा विचार करता सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांचे आदेशान्वये व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गडचिरोली सह संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यातील न्यायालयात १३ ऑगस्ट २०२२ रोजी तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, १३८ एन.आय. ॲक्ट प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बॅकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन, मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे, पतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, ग्रामपंचायत, नगर परिषद अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे इत्यादी मामल्याकरीता राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून ८४ प्रलंबित आणि ८४७ दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले आणि २००५२५५४ रुपयांची वसुली करण्यात आली. किरकोळ स्वरुपाच्या मामल्यांकरीता स्पशेल ड्रायव्हरद्वारे एकूण ७२ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यु.बी. शुक्ल व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली, आर.आर.पाटील यांचे देखरेखीखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा न्यायाधिश-१ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश, गडचिरोली यु.एम. मुधोळकर यांनी पॅनल क्र.०१ वर काम पाहिले, पॅनल क्र.०२ वर दिवाणी न्यायाधिश (व.स्तर) तथा मुख्यन्यायदंडाधिकारी, गडचिरोली एम. आर. वाशिमकर तर पॅनल क्रं. ०३ वर सह दिवाणी न्यायाधिश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.), गडचिरोली, सी.पी. रघुवंशी यांनी काम पाहिले. तसेच तृतीय सह दिवाणी न्यायाधिश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.)गडचिरोली, श्रीमती एन.सी.सोरते यांनी Petty Offence cases निकाली काढल्यात.
तसेच पॅनल क्रमांक ०१ मध्ये पॅनल सदस्य म्हणून अधिवक्ता, गडचिरोली जितेश व्ही. गोरे आणि सामाजिक कार्यकर्ती कु. वर्षा मनवर, पॅनल क्रमांक ०२ मध्ये पॅनल सदस्य म्हणून अधिवक्ता, गडचिरोली प्रणाली आर. वासनिक आणि सामाजिक कार्यकर्ता गौतम जी. डांगे, पॅनल क्रमांक ०३ मध्ये पॅनल सदस्य म्हणून सामाजिक कार्यकर्ती श्रीमती अर्चना चुधरी यांनी काम केले.
सदर लोकन्यायालय यशस्वी करण्याकरीता गडचिरोली जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष रविंद्र दोनाडकर तसेच जिल्हा वकील संघाचे जेष्ठ अधिवक्ता आणि इतर वकील वृंद व न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले असे अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here