The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक रिक्त असलेल्या ग्रामपंचायत सदस्य पदांच्या पोट निवडणूक घेण्याकरिता मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र , मुंबई यांचे आदेशान्वये २२ एप्रिल २०२२ अन्वये निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील २२ एप्रिल २०२२ रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदांकरीता पोट निवडणूक घेण्यासाठी मतदार यादीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे राबविण्यात येत आहे.
निवडणूकीचे टप्पे व टप्पा सुरु करण्याची व पूर्ण करण्याची तयारी
प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा गुरुवार २८ एप्रिल २०२२, तर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी गुरुवार २८ एप्रिल २०२२ ते बुधवार ४ मे २०२२ पर्यंत, प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे गुरुवार ५ मे २०२२ आहे.
मतदार यादी कार्यक्रमांतर्गत प्रारुप प्रभागनिहाय मतदार यादीवर मतदार /नागरिकांकडून हरकती व सुचना मागविण्यात येत आहे. तरी हरकती व सुचना संबंधीत तहसिलदार यांचेकडे दाखल करण्यात यावे असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली समाधान शेंडगे यांनी केले आहे.