लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी तर्फे सत्कार समारंभ व मागर्दर्शन कार्यशाळा संपन्न

405

– पोलीस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षेत निवड झालेले नितीन देऊरकर यांचा सत्कार

The गडविश्व
गडचिरोली, ३१ जुलै : येथील लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१९ साली घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यातील नितीन देऊरकर यांची निवड करण्यात आली त्यानिमित्ताने लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी तर्फे त्यांचा शुक्रवार २९ जुलै २०२२ रोजी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ? व त्याची तयारी कशी करावी? व त्याकरिता कोणती पुस्तके अभ्यासावीत या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाला लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी चे संचालक तथा मार्गदर्शक प्राध्यापक राजीव खोबरे सर व प्राध्यापक आशिष नंदनवार सर तसेच अकॅडमी चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कपिल आकुदर, चंद्रभान बुरे, शिरीष गावतुरे या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here