The गडविश्व
गडचिरोली, ६ सप्टेंबर : येथील लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी येथे शिक्षक दिन व अकॅडमीच्या पाचवा वर्धापन उत्साहात साजरा करण्यात आला.
शिक्षक दिन व अकॅडमीच्या पाचवा वर्धापन दिनानिमित्त ३ सप्टेंबर २०२२ ला सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे बक्षीस वितरण शिक्षक दिनाचे व अकॅडमीच्या पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून करण्यात आले.
सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक योगेश इनमुलवार या विद्यार्थ्याने पटकाविल्याने त्याला लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी कडून ३ हजार रुपये रोख बक्षीस अकॅडमीचे प्रा. पाल सर यांच्या हस्ते देण्यात आले. द्वितीय क्रमांक अवनीत गव्हारे या विद्यार्थ्याने पटकावले त्याला अक्षय उद्धरवार यांच्याकडून प्रा. नंदनवार सर यांच्या हस्ते २ हजार रुपये रोख देण्यात आले तर तृतीय क्रमांक पूजा सरकार व स्वप्निल पत्रोजवार या विद्यार्थ्याने पटकावले त्यांना कौशल्य कॅम्पुटर इन्स्टिट्यूट नागेपल्ली यांच्याकडून १ हजार रुपयांचे रोख बक्षीस प्रा. राजीव सर व प्रा. पाल सर यांच्या हस्ते देण्यात आले. चतुर्थ क्रमांक समीर कांबळे या विद्यार्थ्याने तर पाचवा क्रमांक गोपाल रोहनकर या विद्यार्थ्याने पटकावले या विद्यार्थ्यांना किशोर कुमरे जिओ स्मार्ट गडचिरोली यांचे कडून प्रत्येकी ५०० रुपये रोख बक्षीस देण्यात आले तर प्रोत्साहनपर बक्षीस 20 विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके सुरेंद्र ढवळे व लखन घुगरे राज्य परिवहन महामंडळ अहेरी आगार यांच्याकडून देण्यात आले. तसेच अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या चांगल्या कार्यासाठी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अकॅडमीचे प्राध्यापक पाल सर, प्रमुख अतिथी धांडे सर (महाराष्ट्र पोलीस सेवा) तसेच अकॅडमीचे संचालक प्रा.राजीव खोबरे सर व प्रा. आशिष नंदनवार सर होते. कार्यक्रमाचे संचालन अकॅडमी चा विद्यार्थी मनोज कोठारे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. राजीव खोबरे सर तर आभार अंकुश झोडगे या विद्यार्थ्याने मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिरीष गावतुरे, प्रीतम मारबते, हर्षल पंधारे, दर्शन नेवारे, गिरीधर गंडाटे, स्वप्निल पत्रोजवार, प्रज्योत मुरतेली या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.