– अकॅडमीच्या ४० विद्यार्थ्यांची जिल्हा पोलीस दलात निवड
The गडविश्व
गडचिरोली, ५ ऑक्टोबर : नुकताच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीचा निकाल घोषीत करण्यात आला असून लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी गडचिरोली च्या ४० विद्यार्थ्यांची जिल्हा पोलीस दलात निवड झाली. त्यानिमित्त अकॅडमी तर्फे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा नुकताच भव्य सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.
लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा मनोज सुंकरी हा विद्यार्थी जिल्ह्यातून प्रथम आलेला असून यासह मंगेश सहारे, दिलीप हलामी, रवींद्र पदा,आकाश गावडे, कु.वृषाली तुमरेती, कु. सोनाली कोवे, कु. मनीषा वत्ती, राकेश आलाम, कु ज्योती जक्कुला, सागर सिद्धमवार, कु.समृद्धी पुलकरवार, रिकेश लाखनकर, शुभम शेंडे, शैलेश हुलके, परशुराम कडेकरी, कृष्णा दुब्बलवार, निखिल राऊत, कुम् कल्याणी बोलकुंडवार,कु.स्वाती येंबडवार, कु. ममता चिकटला,कु. शीला ठाकूर, कु, धनश्री निकोडे, संपत भिमकारी, श्रीकांत नागुल्ला, ताजू भोयर ,रुपेश तलांडी ,उमेश खेडेकर, कु.दिपाली बुरांडे, अजय मत्तामी, कु. कल्याणी येलंचीलवार , रजनीकांत बोलकुंडवार ,सरोज कोरेत यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाला आयोजीत करण्यात आला होता यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. सत्कार सोहळ्याप्रसंगी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या सत्कार समारंभाला The गडविश्व चे संपादक / संचालक सचिन जिवतोडे व लोकवृत्त न्यूज चे संपादक / संचालक निलेश सातपुते तसेच लक्ष्यवेध अकॅडमीचे संचालक प्रा.राजीव खोबरे सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी चे संचालक प्रा. नंदनवार सर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन दर्शन नेवारे या विद्यार्थ्याने केले तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नंदनवार सर तर आभार कु. चैतन्या शिवणकर या विद्यार्थिनीने मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिरीष गावतुरे, आदित्य नमुलवार,प्रज्योत मुरतेली, गिरीधर गंडाटे, अभय मडावी, मनीष पिकलवार, हर्षल पंदारे, अजिंक्य नेवारे, प्रीतम मारबते या विद्यार्थ्याने सहकार्य केले.