लगाम चक येथील १९ रुग्णांवर उपचार

247

The गडविश्व
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील लगाम चक येथे गावपातळी व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या क्लिनिकच्या माध्यमातून एकूण १९ रुग्णांनी पूर्ण उपचार घेत दारूमुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
दारू सोडण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांना उपचार मिळणे सोयीस्कर व्हावे, यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे अनेक गावात व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले. आतापर्यंत अनेक रुग्णांनी उपचार घेत दारूमुक्तीकडे वाटचाल केली आहे. नुकतेच लगाम चक गावात क्लिनिक घेण्यात आली. यात १९ रुग्णांनी पूर्ण उपचार घेत दारू सोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्व रुग्णांवर पूर्ण उपचार करीत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी अरुण भोसले यांनी रुग्णांचे समुपदेश करीत धोक्याचे घटक सांगितले. संयोजक छत्रपती घवघवे यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेतली. दारूचे दुष्परिणाम पटवून दिले. शिबिराचे नियोजन तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी केले. यशस्वीतेसाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक गिरमाजी सिडाम,ग्राम कोष समिती अध्यक्ष संदिप कोडापे, आयसीआरपी वैशाली उरेते यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here