– भगवान बिरसा मुंडा यांचा आदर्श आदिवासी युवकांनी अंगीकरावे : प्रविण गेडाम अ भा आ वि प सावली तालुका अध्यक्ष
The गडविश्व
सावली : शहीद क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची सावली तालुक्यातील लोंढोली येथे १२२ व्या पुण्यतिथी शहीददिन व स्मृतिदिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
परकीय, राजकीय व्यवस्थेविरुद्ध आदिवासी समाजास संघटित करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलन पुकारून आदिवासी समाजासाठी लढा देणारे, क्रांतीसुर्य, जननायक, महानस्वातंत्र्य सेनानी, भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्य या प्रसंगी बोलतांना शहीद भगवान बिरसा मुंडा यांनी वयाच्या २५ वर्षात क्रांती घडवून मावा माटे मावा राज निर्माण करीत ब्रिटिशाला सडो कि पडो करून लावले आणि होणाऱ्या ब्रिटिशा कळून होणाऱ्या पिळवणुकीतुन देशाला मोकळे केले . आणि मोठी चळवळ उभी केली यामुळे बिरसा मुंडा चा आदर्श आदिवासी समाज बांधाव घेऊन संघर्ष करावा असे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सावली तालुका अध्यक्ष प्रविण गेडाम यांनी प्रतिपादन केले.
भगवान बिरसा मुंडा यांचि चळवळ ही प्रेरणादायी असून आदिवासी समाजातील सम्पूर्ण जमातीनी आता आपल्या हक्क अधिकार न्याया करीता कोणतीही समाजा वर अत्याचार करणारी सरकार कोणतीही असो त्याच्याशी सामना करण्यासाठी एक जुटीने सुसज होण्याची गरज आहे असे जिल्हा अध्यक्ष अतुल कोडापे यांनी प्रतिपादन केले.
बिरसा मुंडा यांनी संविधानिक लडाई लढली, गरीब कुंटूंबात जन्मलेल्या मुंडा परिवारातील या छोट्याशा बालकांनी क्रांती घडवून आणली आणि शिक्षणातून समाज घडतो असा समाजाला विचार दिला असे प्राध्यापक गुरूदास कन्नाके यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले आहे.
सावली तालुक्यातील लोंढोली येथील भगवान बिरसा मुंडा स्मृतिदिना निमित्याने बिरसा मुंडा यांच्या फोटो ला पाहुणे व ग्रामस्थ यांनी मालार्पण आणि पुष्प अर्पण करण्यात केले.
या कार्यक्रमाला ग्रामीण जिल्हा युवा अध्यक्ष अतुल कोडापे, सावली तालुका अध्यक्ष प्रविण गेडाम, प्रा. गुरूदास कन्नाके, गावातील सरपंच उस्टू पेंदोर, समाज अध्यक्ष भास्कर गेडाम, मारोती कोडापे, सचिव दिलीप आत्राम, मोरेश्वर आत्राम, मनोज कुळमेथे, अमर सुरपाम, मुरलीधर सिडाम, सुरेश मेश्राम, राजु मेश्राम आदी अनेक आदिवासी बांधव महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होते.री