– भूसंपादनाकरिता ३० कोटी निधी शासनाकडून मंजूर
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील वडसा – गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाला गती येणार आहे. नुकतेच राज्य शासनाने या रेल्वे मार्गाच्या भूसंपदानाकरिता आता ३० कोटी रुपये मंजूर केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज शहरात एकमेव रेल्वेस्टेशन आहे. या रेल्वे मार्गाचा जिल्ह्यात विस्तार करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून पर्यंत सुरु होते. प्रदीर्घ कालावधीनंतर गडचिरोली-वडसा या रेल्वे मार्गाला केंद्र शासनाने मंजुरी दिली. मात्र दरम्यानच्या काळात विविध कारणास्तव प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने या कामाची गती मंदावली होती. या रेल्वे प्रकल्पासाठी दुसऱ्यांदा एकूण ४६९.२७ कोटी रुपयांचा अंदाजपत्रक तयार करण्यात आला असून रेल्वे विभागाकडून भूसंपादनाचे काम सुरु आहे.
अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पाना गती मिळावी व लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण व्हावेत, या दृष्टिकोनातून अशा प्रकल्पाना राज्य शासनाने काही प्रमाणात आर्थिक सहभाग देण्याचे धोरण स्वीकारले आहे. या प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी राज्य हिस्सा २३४.६४ कोटी एवढा आहे. या नवीन कामासाठी रेल्वे विभागाने ४६.४१ कोटी इतकी रक्कम देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार वडसा-गडचिरोली या नवीन रेल्वेमार्गाकरिता भूसंपादनासाठी ३० कोटी इतकी रक्कम वितरीत करण्यास राज्य शासनाने हिरवी झेंडी दाखविली आहे. यामुळे परेल्वे मार्गाच्या कामाला आता गती येणार आहे.