वन हक्क व पेसा सुक्ष्म नियोजन केंद्र गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांनी सिंसुर गावाच्या ग्रामसभेला दिली भेट

457

– विविध विषयांवर चर्चा
The गडविश्व
गडचिरोली : वन हक्क व पेसा सूक्ष्म नियोजन केंद्र गडचिरोली येथील अधिकारी वर्गाने सिंसुर गावाच्या ग्रामसभेला २ जून रोजी भेट दिली.
यावेळी केंद्राचे समन्वयक नितीन माताघरे यांनी वन हक्क व पेसा कायद्याबाबत ग्रामसभेच्या उपस्थित सदस्यांना माहिती दिली. वनहक्क मिळाल्यावर कशाप्रकारे ग्रामसभेअंतर्गत आराखडा बनवण्यात आला यावर विचारणा करण्यात आली. तसेच वनहक्क मिळाल्यावर वेगवेगळ्या कामाकरीता वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बांबू, तेंदू चे उत्पादन घेत असताना वनसंवर्धन करणे किती गरजेचे आहे हे ग्रामसभा सदस्यांना पटवून सांगण्यात आले.
वन उत्पन्न बाजारमध्ये किंवा कंपन्यांना विकताना तसेच ग्रामसभेचा लेखाजोखा तयार करताना कोणत्या अडचणी येतात काय व केंद्रामार्फत प्रशिक्षणाची गरज आहे काय याबाबत पाहणी करण्यात आली. यावेळी गावात लेखाजोखा तयार करताना काहीही समस्या नसल्याचे निदर्शनात आले. ग्रामसभा ही बांबू व तेंदु यांची सरळ विक्री कंपनीला करतात त्याचप्रमाणे वनातून नाश झालेले आवळा, चारोळी वृक्ष पुन्हा वनाच्या जैवविवधतेमध्ये येवू शकणार यावर ग्रामसभेने मेहनत घेणे गरजेचे आहे याबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी केंद्राचे कायदेविषयक सल्लागार श्रिनिवास संगमवार तसेच कम्युनिटी मोबिलायजर पंकज नंदगिरीवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here