वर्धा : पुलावरून कार कोसळून भीषण अपघात, 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू

499

The गडविश्व
वर्धा : जिल्ह्याच्या सेलसुरा इथे चारचाकी वाहनावरून नियंत्रण सुटल्यामुळे वाहन थेट पुलावरून कोसळल्याने एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ७ मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवळी येथून वर्धाला येत असताना सेलसुरा जवळ हा अपघात झाला.रात्रीच्या वेळी जंगली श्वापद वाहनासमोर आल्याने वाहन अनियंत्रित झालेआणि थेट ४० फुट खोल दरीत ही कार कोसळली. मृतांमध्ये तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांचा पूत्र अविष्कार रहांगडाले याचाही समावेश आहे. मृतांमध्ये निरज चव्हान (22) रा. गोरखपुर (UP), अविष्कार विजय रहागडाले (21 ) रा. गोंदिया , नितेशसिंग (25 )/रा. राज्य ओडीसा, विवेक नंदन (23 ) ), रा. गया बिहार आणि प्रत्युशसिंग हरेन्द्रसिंग (23) रा. गोरखपुर (UP), शुभम जयस्वाल (23) रा. दिनदयाल उपाध्याथ नगर UP, पवनशक्ती (19) रा.गया बिहार अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. रात्री एक वाजताच्या जवळपास हा अपघात झाला. चार वाजेपर्यंत मृत्यूदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अद्यापही इतर मृतदेहांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. सर्व मृतक हे सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. मृतदेह वर्ध्याच्या सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहेत तर या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here