The गडविश्व
गडचिरोली : सेवार्थ फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्यार्थी फक्त शिक्षणातच नाही तर खेळ क्षेत्रात सुद्धा आपले भविष्य घडवू शकतो या अनुषंगाने विद्यार्थांसाठी ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते होते. विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारचे सुप्त गुण दडलेले असते त्या गुणांना वाव मिळावी म्हणून सेवार्थ फाऊंडेशन हे नेहमीच विविध स्पर्धेचे आयोजन करत असते.
सेवार्थ फाऊंडेशन नेहमीच विविध सामाजिक क्षेत्रात काम करण्यास तत्पर आहे. यावेळेस सेवार्थ फाऊंडेशन जि .प. उच्च प्राथमिक शाळा वाघोली. ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथे सेवार्थ फाऊंडेशन तर्फे विद्यार्थ्यांन करीता काल २६ फेब्रुवारी रोजी ला सकाळी ९:०० वाजता हि स्पर्धा १ ली ते ७ वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उद्घाटक म्हणून शा.व्य.समितीचे अध्यक्षा जयश्री ताई पोरटे, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंचा सोनी ताई किरमे , गावातील पोलीस पाटील गेडाम, ग्रा.प. सदस्य राहुल उराडे, मनोज पोरटे तसेच जि.प. शाळेतील मुख्याध्यापक पिपरे, पाल ,चहारे , भैसारे, राठोड र, कडाम तसेच सेवार्थ फाऊंडेशन कडून इंद्रजित सातपुते, नितीन मानकर, राहुल महाकुलकर, रत्नसागर तलाश, मयूर , पियुष, सचिन, अविनाश, कुनाल, दर्शन, महेश, प्रफुल आकश आदी गावातील युवा वर्ग तसेंच गावकरी उपस्थित होते. मॅरेथॉन स्पर्धा संपन्न होताच लगेच बक्षीस वितरण करण्यात आले.