The गडविश्व
चंद्रपूर : जिल्हयासह संपुर्ण देशभरात वाघासाठी प्रसिध्द असलेल्या ताडोबा अधांरी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफरी उदया 11 जानेवारी २०२२ पासून पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महसूल आणि वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालय आधि जिल्हाधिकारी व अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चंद्रपूर ने आज काढले आहे. यामुळे पर्यटकांची हिरमोड होणार आहे. तर 11 जानेवारी 2022 पासून सुरू होणाऱ्या कालावधीसाठी केलेल्या आगाऊ बुकिंगची संपर्ण रक्कम कामकाजाच्या दिवसात www.mytadoba.org या संकेतस्थळावरील संबधित बुकींग खात्याच्या ई-वाॅलटमध्ये जमा केली जाणार आहे.
ई-वाॅलेटमधील रक्कम 30 जून 2023 पर्यंत वैध राहणार आहे. असे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनरक्षक तथा क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगावकर यांनी पत्राव्दारे कळविले आहे.