वायगावची हळद भारतीय टपाल तिकिटावर उमटली

1227

– हळदीला टपाल तिकिटांचा मान , आता संपूर्ण देशात प्रसिद्ध होणार
The गडविश्व
वर्धा,९ जुलै : जिल्ह्याचे पीक वैशिष्ट्य असलेली समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हळद आता भारतीय टपालावर उमटली आहे. भारतीय टपाल खात्याकडून वायगावच्या वैशिष्ट्यपूर्ण हळदीला टपाल तिकिटांचा मान मिळाला असून ही हळद आता टपालाने देखील आपले गुणधर्म सर्वत्र पसरविणार आहे.
वायगावच्या हळदीला समुद्रपूर तालुक्यात बचत गटांच्या माध्यमातून झळाळी देण्याचा प्रयत्न होत आहे. सहा महिन्यांत तब्बल 60 लाखांची उलाढाल हे बचत गट करतात. समुद्रपूर तालुक्यात ७०० मेट्रिक टन इतके हळदीचे उत्पादन होते. यातही वायगावच्या हळदीची प्रसिद्धी सातासमुद्रापार पोहचली आहे. या गावातील हळद आहारासोबतच संस्कारातही वापरली जाते. सर्वाधिक औषधी गुणधर्मामुळे ही हळद अनमोल ठरली आहे. अनेक औषध कंपन्यांनी वायगावची वारी केली. दहावर फार्मर प्रोड्युसर कंपन्या परिसरात कार्यरत आहेत. यातही महिला बचत गटांचा कल्याणी संघ हा आपले वैशिष्ट्य राखून आहे. हळदीच्या प्रचार – प्रसारात वायगाव हळद कुठे कमी पडते काय? यासाठीच प्रयत्न केले जात आहे.फार्मर प्रोड्युसर कंपनी, डी आर डी ए, आत्मा व बचत गटांनी भारतीय डाक विभागाच्या सहकार्याने टपालाच्या माध्यमातून वायगगावची हळद सातासमुद्रापार पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. वायगाव हळदीचे गुणधर्म ओळखून आधीच वायगाव हळदीला भौगोलिक नामांकन मिळवून घेतले आहे. प्रोड्युसर कंपनीचे प्रशांत भगत यांनी डाक विभागाकडे अशा प्रकारच्या हळद उत्पादनाला टपाल तिकिटावर मान मिळण्यासाठी प्रस्तावित केले होते.
भारत सरकार द्वारा भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्री मध्ये वायगांव हळद या उत्पादनासाठी वायगांव हळद उत्पादक संघ, समुद्रपुर भौगोलिक उपदर्शन संख्या क्रं. 471 म्हणजेच जी.आई. टैग प्राप्त झालेला आहे. वायगांव हळद तालुका समुद्रपुर जिल्हा वर्धा अंतर्गत एक परंपरागत कृषी उत्पादन आहे.

डाक विभागद्वारा वेळो वेळी, महान व्यक्ति, संस्था, स्मारक, इत्यादि वर स्मरणार्थ डाक तिकीट, काही महत्वाचे वेळी विशेष कैंसलेशन किंवा विशेष आवरण जारी केल्या जाते. हे विशेष आवरण सुद्धा ह्याचेच द्योतक आहे. विशेष आवरणाचे महत्व फिलाटेली मध्ये भरपूर आहे. बरेचसे फिलाटेलिस्ट राष्ट्रीय किंवा अंतर्राष्ट्रीय स्तरावर आयोजित फिलाटेली प्रदर्शनी मध्ये विशेष आवरणला प्रदर्शित करतात.
‘अतुल्य भारत की अमुल्य निधी’ ही संकल्पना भारतीय डाक खात्याकडून राबविली जात आहे. या अंतर्गत ज्या ज्या भागात जे जे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन असेल त्याची प्रसिद्धी टपाल तिकिटांच्या माध्यमातून केली जाते. वायगाव येथील हळद उतपादन देखील टपाल तिकिटावर उमटले आहे. याशिवाय हे उत्पादन कसे वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे याची माहिती देखील दिली आहे. वायगाव हळदीचे चित्र टपालावर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला हळदीची गुणधर्म तसेच इतर महत्वपूर्ण माहिती नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here