The गडविश्व
चामोर्शी : वनपरीक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनिकरण, गडचिरोली व नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक विद्यालय विक्रमपूर यांच्या वतीने आज ५ जुलै रोजी वृक्ष दिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पर्यावरणाचे रक्षण व वनांचे संरक्षण याचे महत्त्व पटवून देण्यासाठी, नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व वनविभागाचे कर्मचारी यांच्या सहकार्याने गावात वृक्षदिंडी काढून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष प्रतिज्ञा घेऊन विद्यालयाच्या आवारात शिक्षकां सोबत वृक्षलागवड केली. एक विद्यार्थी, एक वृक्ष या संकल्पनेनुसार प्रत्येक विद्यार्थ्यांने किमान एक झाड लावून ते जगवण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सामाजिक वनिकरण, गडचिरोली चे वनक्षेत्रपाल धीरज ढेंबरे यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच श्रीकांत ओल्लालवार, सेवानिवृत्त वनपाल डब्लू. एन. घेरकर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने सामाजिक वनीकरण चे वनरक्षक विवेक अलोणे , मुख्याध्यापिका एस. एच. गायली तसेच शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक संतोष निकुरे यांनी केले तर आभार कार्यालयीन लिपिक नितेश सोमलकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक वनीकरण चे हंगामी मजूर , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.