The गडविश्व
सावली, ३१ जुलै : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपुर अंतर्गत गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातील आसोला मेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग क्र:-२, सावली, उपविभाग क्र:-०५,व ०९ अंतर्गत येणाऱ्या व्याहाड शाखा कालव्यावरील, वितरीका स्तरीय पाणीवापर संस्था स्थापनेची “निवडणूक पुर्व सभा” मोखाळा येथील कृषी संजीवनी पाणी वापर संस्थेच्या लाभक्षेत्रातील ग्रामपंचायत सभागृहात २८ जुलै २०२२ रोजी पार पडली.
सदर सभा मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था मुंबई विद्यापीठाचे सावली येथील गटस्थरीय कार्यालयाचे मार्गदर्शनात आयोजीत करण्यात आली. या सभेला सावली विभागातील आसोला मेंढा प्रकल्प नुतनीकरण, उपविभाग क्र:-५चे कनिष्ठ अभियंता वैजनाथ पिसाळ, विभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी २ स्वप्नील मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेला मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था मुंबई विद्यापीठ सावली विभागातील गटस्थरीय समन्वयक चेतन उंदीरवाडे व प्रशिक्षक यशवंत कवाडे यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम २००५ नियम २००६ कलम १० अन्वये व्याहाड शाखा कालव्यावरुन सिंचन होणाऱ्या “किसान सहकारी पाणी वापर संस्था निमगाव, जलदुत पाणी वापर संस्था दाबगांव, कृषक पाणी वापर संस्था थेरगांव, भारतीय किसान पाणी वापर संस्था चिचबोडी, कृषी संजीवनी पाणी वापर संस्था मोखाळा, किसान पाणी वापर संस्था केरोडा, कृषी जीवन पाणी वापर संस्था व्याहाड बुज” या संस्थांचा समावेश केला जाणार आहे. या पाणी वापर संस्थांमधील एकुन ५९ संचालक मतदार म्हणुन राहणार आहेत, यामधुन *वितरिका स्तरीय पाणीवापर संस्था स्थापन करावयाची असुन १२ संचालक निवडुन द्यावयाचे आहेत, या निवडणुकीत भाग घेण्यासाठी, संस्थाचे निकष, नियमावली, निवडणुकीची आचार संहीता, अधिसुचना,
उमेदवारी फार्म भरण्याची प्रक्रिया उमेदवारांची पात्रता, संस्थाचे लेखापरिक्षण, सर्वसाधारण सभा, मासिक सभा, नियमित पाणी पट्टी वसुली, फंक्शनल ग्रॅंट मिळविण्यासाठी संस्थेचे १० टक्के स्व हीस्सा, इत्यादी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन मुंबई विद्यापीठा तर्फे करण्यात आले. सभेला निमगाव पावासंचे सचिव मुक्तेश्वर लोणारे, थेरगाव संस्थेचे अध्यक्ष एकनाथ चुधरी, दाबगांव पावासंचे संचालक देवा आभारे, गिरीधर रायपुरे, चिचबोडी पावासंचे अध्यक्ष विनायक चापले, मोखाडा पावासंचे विनायक दुधे, केरोडा पावासंचे अध्यक्ष सुरेश वद्देलवार, व्याहाड बुज पावासंचे सचिव मुकेश कांबळे यांचेसह २८ संचालक व मुंबई विद्यापीठाचे अधिकारी उपस्थीत होते.
सभेचे प्रस्ताविक मुंबई विद्यापीठाचे गटस्थरीय कार्यालयातील क्षेत्रीय समन्वयक दिलीप फुलबांधे यांनी केले तर आभार प्रदर्शन बाबाराय भोसले.यांनी मानले.