– बुलढाणा येथे सर्वाधिक कमी 9.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
The गडविश्व
नागपूर : पुढील दोन दिवस नागपूरसह विदर्भात थंडीची लाट राहणार असल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पहाटेच्या तापमानात कमालीचं घट झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पहाटेचं तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेले.
वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे राज्यातल्या तापमानात घट झाली आहे. या पश्चिमी वाऱ्यांमुळे दरवर्षी उत्तर भारतात थंडीची लाट येते. मात्र यंदा उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातातही त्याचा प्रभाव जाणवत आहे.
राज्याच्या उपराजधानीतही कडाक्याची थंडी आहे. आज नागपुराचा पारा हा 10.2 अंश सेल्सिअसवर होता. विदर्भात सर्वाधिक कमी तापमान 9.2 अंश सेल्सिअस बुलढाणा येथे नोंदविले गेले. विदर्भात काल पासून थंडीची तीव्रता वाढत असल्याने पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकाळच्या वेळेस घराबाबाहेर उबदार कपडे घातल्याशिवाय पडणे अवघड झाले आहे. शहरात ठिकाठिकाणी शेकोटी लावलेल्या दिसत आहे.