The गडविश्व
गडचिरोली, २ ऑगस्ट : विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी व जागृती करण्यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे शाळा कार्यक्रम घेण्यात येत आहेत. एटापल्ली तालुक्यातील दुर्गम अशा कांदोळी गावातील जि.प प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून व खेळाच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. सोबतच विद्यार्थ्यांनी व्यसनविरोधी शपथ सुद्धा घेतली.
मुक्तिपथ द्वारे व्यसनातून मुक्त होण्यासाठी विविध गावात शिबिरे आयोजित करून नागरिकांना समुपदेशन केल्या जाते. तसेच अवैध दारूविक्री वर अंकुश घालण्याकरिता कारवाया करण्यात येतात. त्याचप्रमाणे आता विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी व जागृती करण्यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे शाळा कार्यक्रम घेण्यात येत आहेत.