– ५ मे पासून दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेटचे वाटप केले जाणार
The गडविश्व
मुंबई : इयत्ता दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ५ मे पासून मोफत टॅबलेटचे वाटप केले जाणार असल्याचे हरियाणा सरकारने जाहीर केले आहे. . हरियाणा सरकारने यााबत अधिकृत निवेदन जाहीर केले आहे. त्यानुसार टॅबलेटमध्ये शिकवण्याचे सॉफ्टवेअर प्री-लोड केले जाईल आणि पाच लाख विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट डेटाही दिला जणार आहे.
हरियाणा सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, सरकार पाच लाख विद्यार्थ्यांना टॅबलेट आणि मोफत डेटा प्रदान करेल. सरकारी शाळांमध्ये शिकणारे लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे. ५ मे रोजी रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठाच्या टागोर सभागृहात मोफत टॅबलेट वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हेही उपस्थित राहणार आहेत. रोहतक शहरातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट दिले जातील, असे हरियाणा सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्याच दिवशी राज्यभरातील ११९ ब्लॉकमध्ये टॅबलेट वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मंत्री, खासदार, आमदार आणि इतर पाहुणे मोफत टॅबलेटचे वाटप करणार आहेत.