The गडविश्व
गडचिरोली, २१ नोव्हेंबर : शालेय विद्यार्थ्यांना व्यसनासंदर्भात जागृत करण्यासाठी मुक्तीपथ अभियानाच्या वतीने शाळा कार्यक्रम घेतले जात आहेत. नुकतेच एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम अशा जिप शाळा परसलगोंदी येथे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना खेळातून व्यसनमुक्तीचे धडे देण्यात आले. सोबतच व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.