THE गडविश्व
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एकूण सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल 14 डिसेंबर जाहीर झाला. सहापैकी चार जागा अगोदरच बिनविरोध निवडून गेल्या आहेत. निवडणूक बिनविरोध पार न पडलेल्या नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील उमेदवारांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी 14 डिसेंबर रोजी पार पडली होती. यात अपेक्षेप्रमाणे नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे तर अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात वसंत खंडेलवाल विजयी ठरले. यामुळे या विधान परिषद निवडणुकीत सहापैकी चार जागांवर भाजपने विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. नुकत्याच झालेल्या या विधान परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांचा आज दुपारी एक वाजता विधिमंडळात शपथ विधी होणार आहे.
यामध्ये
चंद्रशेखर बावनकुळे, भाजप
वसंत खंडेलवाल, भाजप
राजहंस सिंग, भाजप
अमरिश पटेल, भाजप
सतेज पाटील, काँग्रेस