विधानसभेत आमदारांचा राडा : एकमेकांत भिडले

606

– एकमेकांचे फाडले कपडे , अनेक आमदार निलंबित

The गडविश्व
कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभेत आमदारांचा राडा पाहायला मिळाला. भाजप-टीएमसीचे आमदार एकमेकांत भिडले. यावेळी दोन्ही राजकीय पक्षाच्या आमदारांनी एकमेकांचे कपडे फाडले. राड्यात काही आमदार जखमी झाले असून बीरभूम प्रकरणावरून विधानसभेत हाणामारी पाहायला मिळाली.
पश्चिम बंगाल विधानसभेत सत्ताधारी टीएमसी आणि भाजपच्या आमदारांमध्ये हाणामारी झाली. यावेळी सभागृहातील नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची करण्यात आली. आमदारांनी विधानसभेच्या सभागृहातील दिवे तोडले. रामपूरहाट हिंसाचार आणि पश्चिम बंगाल कायदा आणि सुव्यवस्था प्रकरणावर विधानसभेत चर्चा सुरू होती. यावेळी हा राडा पाहायला मिळाला.
विधानसभेत भाजप आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी रामपूरहाट, बीरभूम घटनेवर चर्चेची मागणी करत होते. यानंतर भाजप आमदारांनी वेलमध्ये धरणे सुरू केले. विधानसभेत हे प्रकरण चांगलेच तापले आणि तृणमूल-भाजपचे आमदार एकमेकांना भिडले. हाणामारीत भाजपचे आमदार मनोज तिग्गा यांचे कपडे फाटले. दुसरीकडे, टीएमसी आमदार असित मजुमदार यांच्या नाकाला दुखापत झाली आहे. विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या अनेक आमदारांना निलंबित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here