– मुख्य न्यायदंडाधिकारी एम.आर.वाशीमकर यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, १८ ऑगस्ट : महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली येथील मुख्य न्यायदंडाधिकारी एम.आर.वाशीमकर यांनी २ वर्ष सश्रम कारावास व ४ हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली आहे. वामन ब्रम्हानंद कोकीळ (३५) रा. नवरगाव असे आरोपीची नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, १० नोव्हेंबर २०२१ रोजी आरोपी वामन कोकीळ ने पिडीतेच्या घरी जावून विनयभंग केला. याप्रकरणी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तोडी तक्रार दाखल केली असता पोलीसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हयाचा तपास पोहवा भुनेश्वर गुरूनुले यांनी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
आज १८ ऑगस्ट रोजी गडचिरोली येथील मुख्य न्यायदंडाधिकारी एम.आर.वाशीमकर यांनी आरोपी वामन कोकीळ यास दोषी ठरवून कलम ३५४ भा.द.वि मध्ये २ वर्ष सश्रम कारावास व ३५०० रूपये दंड तसेच कलम ३४१ भा.द.वि मध्ये १५ दिवस साधा कारावास व ५०० रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता अमर फुलझेले तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोहवा यशवंत मलगाम व कोर्ट मोहरर पोशी हेमराज बोधनकर यांनी कामकाज पाहिले.