– क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा युवा मंडळाच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली : विविध क्रिडांच्या माध्यमातून युवकांनी जिद्द, चिकाटी सारखे गुण अंगीकारून भविष्य घडवावे असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे याची केले. ते चांदाळा येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा युवा मंडळाच्या वतीने कबड्डी स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
चांदाळा येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा युवा मंडळाच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते पार पडले. तर अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा जिल्हानिरीक्षक डॉ.नामदेवराव किरसान उपस्थित होते. तर मुख्य अतिथी म्हणून सरपंच सुनीता गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, संजय चन्ने, मदन मडावी, हिरापूर चे सरपंच दिवाकर निसार, सुरेश बांबोळे, संजय खोब्रागडे, अशोक नैताम, आनंदराव कुमरे, ग्रामसेवक विलास दुर्गे, राजेंद्र मेश्राम, सुभास किरंगे, गजानन मेश्राम, मोरेश्वर कोराम, मोरेश्वर नैताम, नरेशजी कुमरे, उमाजी किरंगे, शालीक बारसागडे, नरेंद्र कुमोटी, माणिक मडावी, हेमंत ढोक, नरेंद्र मडावी, विलास कुमरे, मुख्याध्यापक मुळे, ढिवरु मेश्राम आदी मान्यवर व कबड्डीच्या सहभागी चमू यावेळी उपस्थित होते.