विश्व पुस्तक व कॉपीराइट दिन सप्ताह विशेष

568

शेक्सपिअर : जन्म-मृत्यूची तारीख व गांव एकच !

जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन दरवर्षी २३ एप्रिल रोजी साजरा केला जातो. वर्ल्ड बुक कॅपिटल २०२० मलेशियाची राजधानी असलेले क्वालालंपूर आहे. युनेस्को आणि त्यासंबंधित संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करतात. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे, जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दीष्ट आहे. याचा उहापोह अलककार- कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी यांनी या लेखातून प्रभावी शब्दशैलीत मांडला. 

विश्व पुस्तक दिवस हा २३ एप्रिललाच का साजरा करावा ? तर विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हंटिस व इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने हाच दिवस विश्व पुस्तक दिन म्हणून घोषित केले. हा दिवस पहिल्यांदा २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. तर स्पेनमध्ये मिगेल डे सर्व्हांटिसच्या स्मरणार्थ तो साजरा केला होता. त्यानंतर सन १९९५ मध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोची सर्वसाधारण सभा झाली होती. त्यात जगभरातील लेखकांचा आदर करणे, त्यांना श्रद्धांजली वाहणे आणि पुस्तकांमध्ये रस निर्माण करणे या हेतूने जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल असा निर्णय घेतला गेला. आता कॉपीराइट म्हणजे काय ? तर
कॉपीराइट ही एक कायदेशीर संज्ञा आहे. एखाद्या रचनेचा मूळ लेखक किंवा निर्मात्याचे त्या रचनेवर मर्यादित काळासाठी विशिष्ट हक्क असतात. ज्या कंपनीस किंवा ज्यास तो ते वापरण्याचे अधिकार देतो, ती व्यक्ती ही रचना व्यावसायिक किंवा इतर कारणांसाठी वापरू शकते. कधीकधी निर्माता प्रकाशन संस्थेशी करार करतो. नंतर कॉपीराइटचा अधिकार एका विशिष्ट प्रकाशनाकडे जातो. त्या प्रकाशना व्यतिरिक्त अन्य कोणी ती रचना वा साहित्य वापरू शकत नाही. जर कोणी याचे उल्लंघन केले तर त्याच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
ज्ञान देण्याबरोबरच पुस्तकांमध्ये मनोरंजन करण्याची अद्वितीय क्षमता आहे. पुस्तके आपल्याला ज्ञान देतात, यात शंकाच नाही, परंतु पुस्तकांमध्ये बर्‍याच मनोरंजक गोष्टी देखील वाचायला मिळतात. ती आपले मनोरंजन देखील करतात. आपली भाषा देखील पुस्तकाद्वारे सुधारते. एखाद्या चांगल्या मित्र-मैत्रिणीहून कल्याणकारी सल्ला देणारा तो जिगरी दोस्त आहे. क्रांती, शांती, दया, माया, अशा दैवीगुणांचा परिपाक त्यांच्या वाचनातून साधता येतो. शिक्षणसम्राट महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले व फातिमाबी शेख, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुस्तक वाचूनच समाजसुधारण्याची उर्मी व प्रेरणा प्राप्त झाली. वडीलधाऱ्या मंडळींनी पैला पै जोडून मोठाले ग्रंथ, पुस्तके घरी कोनाड्यात जपून ठेवली आहेत. ती तशीच बासनात गुंडाळलेल्या अवस्थेत धूळ खात पडून आहेत. मात्र सुपुत्र-सुकन्यांची ते उघडून बघण्याची तर जाऊ द्या, साधी त्यावरची धूळ झटकण्याची बिशाद होत नाही. आज इतका उच्चविद्याविभूषित माणूस पुस्तकांचा द्वेष करतो की काय ? म्हणे, “आज सर्व मोबाईल व इंटरनेटवर सर्व काही वाचण्यास मिळतो, मग पुस्तकांची काय गरज ?” अरे, हो ! अगदी खरे. पण तू ते गुगल- इंटरनेट यांवर सर्च करून खरेच मिचमिचत्या नेत्रांनी किंवा डोळे फाडफाडून खरेच वाचतोच ? नाही, नुसत्याच काहीच्या बाही टिवल्या-बावल्या पाहतोस; खरेय ना हे ? वाचनाशी माणसाची मैत्री असावी. मोठ्या रस्त्याने दुतर्फा लावलेली झाडे पांथस्थास जशी सावली देतात व सुखाच्या प्रवासात सोबतीने भागीदारी करतात, तसे मानवी जीवनप्रवासात पुस्तके ही जीवनप्रवास समृद्ध करतात. सर्जनशीलतेचा महामार्ग पुस्तकांच्या पानापानांतूनच जातो. आपल्या मराठी भाषेतही विपुल साहित्यसंपदा उपलब्ध आहे. वि.स. खांडेकर, वि.वा. शिरवाडकरांपासून आजपर्यंतच्या भालचंद्र नेमाडे यांच्यापर्यंत. तर रवींद्रनाथ टागोरांपासून गुलजार साहेबांपर्यंत. कन्नड भाषेतही दिग्गज लेखक आहेत. शिवराम कारंथांसारख्या लेखकाची पुस्तके अनेक भाषांत भाषांतरीत झाली आहेत. गुणी जणांनी एवढा आटापिटा का केला असेल ?
हा दिवस जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये विविध पद्धतींनी साजरा केला जातो. काहीजण पुस्तके विनामूल्य वितरित करतात, तर कुठे स्पर्धा आयोजित केली जाते. स्पेनमध्ये दोन दिवस रीडिंग मॅरेथॉनचं आयोजन केलं जाते. या मॅरेथॉनअखेरीस एका लेखकाला प्रतिष्ठित मिगेल डे सर्व्हांटिस पुरस्कार दिला जाते. स्वीडनमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लेखन स्पर्धा घेतल्या जातात. २३ एप्रिल दिवस जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये विविध पद्धतींनी साजरा केला जातो. काहीजण पुस्तके विनामूल्य वितरित करतात, तर कुठे स्पर्धा आयोजित केली जाते. स्पेनमध्ये दोन दिवस रीडिंग मॅरेथॉनचं आयोजन केले जाते. या मॅरेथॉनअखेरीस एका लेखकाला प्रतिष्ठित मिगेल डे सर्व्हांटिस पुरस्कार दिला जाते. स्वीडनमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लेखन स्पर्धा घेतल्या जातात. शेक्सपिअर यांचा जन्म व योगायोगाने मृत्यूदिनही तीच तारीख तर जन्मगाव व मृत्यूगावही एकच होते. असा योग त्यांच्या बाबतीत घडून आला. शेक्सपिअरच्या शरीरधर्माला भूतलावर अवघे पन्नाशीचे आयुष्यमान लाभले पण लेखनाने निर्माण केलेले कीर्तीमान अमर ठरले आहे. लेखन क्षेत्रात सर्वोच्च कीर्ती-प्रसिद्धी व सर्वोच्च श्रीमंती-आर्थिक सुबत्ता लाभलेला बहुधा हा एकमेव माणूस असावा. ३८ नाटके व १५४ कविता ही त्यांची लेखन संपदा होय. एकूण नाटकांपैकी १० ऐतिहासिक, १६ सुखात्मक व १२ शोकात्मक आहेत. शेक्सपिअरच्या साहित्य संसदेचे वैशिष्ट्य म्हणजे जगात ज्ञात असलेल्या सर्वच भाषांत त्यांची पुस्तके अनुवादित झालेली आहेत. माणूस वाचून वाचून मनातील काहीतर लिहावयास लागावा, म्हणून एका कविमहोदयाने नकलून ठेवले-
“लिहिणाराने लिहीत जावे,
वाचणाराने वाचत जावे!
कधीतरी वाचणाराने,
लिहिणाराचे शब्दच घ्यावे!!”
इतके सुंदर प्रभावी आहे हे पुस्तक व ग्रंथ वाचणे. वाचनाने आपली भाषा, विचार समृद्ध होत जातात. “माझ्याकडे इतकी संपत्ती, इतका जमीनजुमला आहे.” असल्या फालतू अहंवर्धक गोष्टी पुस्तक वाचल्याने पार भस्म होऊन जातात. विचारांची ही श्रीमंती तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. वाचनाने विचार आणि वाचा यात प्रगल्भता येते. म्हणून वाचाल तर वाचाल आणि समृद्धपणे जगाल, एवमेव मात्र खरे!

!! विश्व पुस्तक व कॉपीराइट दिन सप्ताह निमित्ताने सर्व बंधुभगिनींना हार्दिक शुभेच्छा !!

अलककार – कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी.)
मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.
जि. गडचिरोली, मोबा. ७७७५०४१०८६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here