विश्व सहल दिन : ऐतिहासिक व निसर्गरम्य स्थळाची भेट !

569

विश्व सहल दिन विशेष

आज आपण याच आंतरराष्ट्रीय सहल दिवसाविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणून घेणार आहोत. ज्यात आंतरराष्ट्रीय सहल दिवस कधी आणि केव्हा साजरा केला जातो?कशापद्धतीने साजरा केला जातो ? का साजरा केला जातो ? हा दिवस साजरा करण्यामागचा मूळ इतिहास काय आहे ? इत्यादी महत्वाच्या बाबींचा आढावा घेणार आहोत. सहल म्हटले की पहिले आपल्याला आपले शाळेचे दिवस आठवतात, कारण लहान असताना नेहमी आपल्या शाळेची कुठेतरी ऐतिहासिक तसेच निसर्गरम्य स्थळी सहल जायची. त्यामुळे सहल ही आपणास लहानपणापासूनच माहीत आहे. पण आता सहल ही शाळेत जात असलेल्या लहान मुलांपुरतीच सिमित राहिलेली नाहीय, तर लहानांपासून मोठ्यांपर्यत सगळ्यांचीच आवडती गोष्ट झाली आहे. आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करण्याचे हे एक उत्तम साधन तसेच माध्यम बनले आहे.
आंतरराष्ट्रीय सहल दिवस हा दरवर्षी १८ जून रोजी साजरा केला जात असतो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय सहल दिवस साजरा करण्याचे मुख्य उददिष्ट म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून आपण प्रत्येक व्यक्तीने आपल्या फॅमिलीसोबत एक चांगला वेळ व्यतीत करायला हवा त्यांच्यासोबत बाहेर एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सहलीला जायला हवे. त्यांना आपण आपल्या कामातून सवड काढून वेळ द्यावा, त्यांच्याशी संवाद साधावा, हेच समजावून सांगण्यासाठी आणि आपणास आपल्या जीवनातील सहलीचे महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय सहल दिनाच्या दिवशी सर्व फॅमिली, मित्र, मैत्रीणी जमतात आणि निसर्गाच्या सान्निध्यात किंवा एखाद्या आपल्या आवडत्या पर्यटनस्थळी जातात. तेथे पर्यटनाचा आनंद घेतात. मनावरील ताणतणाव येथे झटकून मन हलके केले जाते. तंबू गाडून तेथे पिकनिकचा आनंद साजरा करतात किंवा याच दिवशी लहान मुले गार्डनमध्ये जाऊन खेळतात. स्विमिंग पुलमध्ये स्वीमिंग करतात. खुप खेळता बागडता गप्पा गोष्टी करतात. बाहेरगावी एखाद्या पाहण्याजोग्या स्थळी ट्रिपला जातात. तर मोठी माणसे याचदिवशी एखाद्या धार्मिक देवस्थानाला भेट देतात. शाळेत देखील हा दिवस एखाद्या सुट्टीप्रमाणे साजरा केला जातो. या दिवशी सर्व शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन एखाद्या बगीचात जातात किंवा एखाद्या समुद्रकिनारी, निसर्गसौंदर्य असलेल्या किंवा ऐतिहासिक स्थळी जातात. तेथील ज्ञानवर्धक माहिती टिपून घेतात.
आंतरराष्ट्रीय सहल दिवसाचा इतिहास असा कथन केला जातो- आंतरराष्ट्रीय सहल दिवस हा फ्रान्स या देशात एकोणिसाव्या शतकामध्ये सर्वप्रथम साजरा केला गेला. तेव्हापासून दरवर्षी १८ जून रोजीच हा दिवस साजरा करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय सहल दिवस सगळ्यात प्रथम फ़्रान्स देशात साजरा करण्यात आला होता. या दिवशी इथे राहणारे लोक निसर्गाचे सान्निध्य असलेल्या समुद्राकाठी एखाद्या शांत- निरव ठिकाणी जातात आणि आपल्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ व्यक्तीत करतात. सोबतच चीज, ब्रेड, फ्रूटस तसेच वाईन इत्यादींचा आनंद देखील घेतात. अशा ठिकाणी मादक पदार्थांचे सेवन करून मौजमस्ती करणे टाळले पाहिजे. ही अवस्था प्राणघातक ठरू शकते. पिकनिक डे साजरा करणे हे फ्रान्स या देशात फ्रेंच राज्यक्रांतीचा शेवट झाल्यानंतर सुरू झाले. फ्रेंच राज्यक्रांती संपुष्टात आल्यानंतर पहिल्यांदाच येथील जनतेसाठी रॉयल नावाचे गार्डन सुरू करण्यात आले. त्यानंतर फ्रेंच देशातील लोक आपल्या फॅमिलीसोबत येऊन वेळ व्यतीत करू लागले. घरून स्वयंपाक तयार करुन गार्डनमध्ये जाऊन गप्पागोष्टी करत खाऊ पिऊ लागले. तेव्हापासून ही तेथील प्रथाच बनून गेली. पण आता हाच दिवस फ्रान्स व्यक्तीरीक्त संपूर्ण जग देखील हळुहळू मान्य करू लागला आहे. म्हणूनच भारत देशात तसेच जगभरात दरवर्षी १८ जून रोजी हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जाऊ लागला आहे. इंटरनॅशनल पिकनिक डेला मराठीत आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जाणारा सहलीचा दिवस म्हणून संबोधिले जाते.
भारत देशात मागील तीन वर्षांपासून कोरानाचा जीवघेण्या भस्मासुराचा थयथयाट सुरू आहे. त्यामुळे एकमेकांत शारीरिक अंतर पाळणे महत्त्वाचे झाले आहे. अशा पर्यटनस्थळी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे लाभदायक ठरत नाही. म्हणून सद्यातरी या ज्ञानवर्धक जागतिक सहल दिनी पर्यटनाचा बेत स्थगित ठेवणेच इष्ट राहील.
!! गडविश्व न्यूज नेटवर्क परिवारातर्फे ऐका, यानिमित्ताने गर्दी करणे टाळा, मास्कचा वापर करा, शारीरिक अंतर पाळा व वेळोवेळी हात सॅनिटायझरर्ड करा !!

श्री. कृ. गो. निकोडे, से.नि.प्राथ.शिक्षक.
(समाज सुधारणावादी विचारांचे लेखक व कवी)
गडचिरोली, फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here