विसापूर येथील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकातून बीज प्रक्रियेची माहिती

284

The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक कृषी महाविद्यालयातील कृषी विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषि जागृकता कार्यानुभव उपक्रमांतर्गत विसापूर येथील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकातून बीज प्रक्रियेसंदर्भातील विस्तृत माहिती दिली.
या प्रात्यक्षिक कार्यक्रमात विद्यार्थिनींनी बीज प्रक्रिया करण्याची योग्य पद्धत व बीज प्रक्रियेचे महत्व शेतकऱ्यांना पटवून दिले. हा उपक्रम कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू, उपक्रम अधिकारी डॉ. प्रविण म्हाताडे, मार्गदर्शक नरेश बुद्धेवार, विषय तज्ञ डॉ. गजानन चंदनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विद्यार्थिनी दिव्या अतकरी, धनश्री प्रधान, ज्ञानेश्वरी बडगे, योगिनी वरकडे यांनी राबविला.
याप्रसंगी शेतकरी महादेव भोयर, राजेश्वर भोयर, द्राविद्र बानबले, खुशाल म्हशाखेत्री, कालिदास कोटगले, संजय बानबले, चेतक भोयर, खोमन रोहणकर यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here