The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक कृषी विज्ञान केंद्र व कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कृषक विद्यार्थ्यीनींनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील विसापूर येथील शेतकऱ्यांना बियाणांची उगवणक्षमता तपासणी पद्धतीबद्दल प्रात्यक्षीतून माहिती दिली.
गावातील शेतकरी राजेश्वर भोयर, महादेव भोयर, संजय बानबले, खोमन रोहणकर, कालिदास कोटगले, द्रविद्र बानबले आदी शेतकऱ्यांना बियाणांची उगवण क्षमता तपासणी पद्धत प्रात्यक्षिक करून दाखविले. सोबतच उत्पादन वाढीस त्याचा कसा फायदा होतो हे सुद्धा कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पटवून दिले.
सदर प्रात्यक्षिक कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. कऱ्हाडे, उपक्रम अधिकारी प्रवीण महातळे, उपक्रम मार्गदर्शक नरेश बुद्धेवार, विषयतज्ञ डॉ. गजानन चंदनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विद्यार्थिनी धनश्री प्रधान, ज्ञानेश्वरी बडगे, दिव्या अतकरी, योगिनी वरकडे यांनी सादर केले.