The गडविश्व
गडचिरोली : वनपरीक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनिकरण विभाग, गडचिरोलीच्या वतीने धानोरा तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल मोहली व जिल्हा परिषद शाळा खडकाडी या हरित सेना शाळांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना वृक्ष प्रतिज्ञा देऊन वृक्षाचे अधिक महत्त्व पटवून देऊन एक विद्यार्थी एक झाड या संकल्पनेनुसार प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान एक झाड लावावे याबाबत वनपाल बोगा यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जि प शाळा मोहली चे मुख्याध्यापक डी. जी. नरोटे,
, खरकडी सरपंच मडावी, खरकाडी चे मुख्याध्यापक पोरड्डिवार तसेच इतर शिक्षक कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.