वैनगंगा नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

993

– खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला पाण्यात
The गडविश्वभं

डारा : काल धुलिवंदनाच्या दिवशी मित्रासोबत माडगी येथील वैनगंगा नदीवर पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली आहे.चाहूल हरीश इलमे(१८) रा. बजाज नगर तुमसर असे मृत तरुणाचे नाव आहे.

चाहूल हा आपल्या चार ते पाच मित्रासोबत तो माडगी येथील वैनगंगा नदीपात्रात पोहायला गेला होता. नदीपात्रात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चाहूल गटांगळ्या खाऊ लागला. यावेळी त्याचे मित्र मदतीकरिता धावले व त्यांनी आरडाओरड केली. परंतु, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मित्रांनी चाहूलच्या काकाच्या मुलाला मोबाईलवर दिली. कुणाल ईलमे तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. कोळी बांधवांच्या मदतीने चाहूलला पाण्यातून काढण्यात आले. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटनेची नोंद करडी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास करडी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here