– शेतीचे अतोनात नुकसान, पुनर्वसन करण्याची गावकऱ्यांची मागणी
The गडविश्व
देसाईगंज,१७ ऑगस्ट : गडचिरोली-चंद्रपूर जिल्हयाच्या सिमेलगत असेलेल्या चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपूरी तालुक्यातील लाडज गावाला महापुराने वेढले असून बेटाचे स्वरूप आले आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यातील धोका लक्षात घेता आमचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करा अशी मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे.
चंद्रपूर जिल्हयाच्या शेवटच्या टोकावर ब्रम्हपूरी तालुक्यात वैनगंगा नदी किणारी लाडज हे छोटेस गाव आहे. मुसळधार पावसाने गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या पातडीत वाढ झाल्याने धरणाचे पाणी सोडल्या जात आहे यामुळे वैनगंगा नदी पात्रातीलही पाण्याच्या पातडीत वाढ झाल्याने पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वैनगंगा नदी किनारी असलेल्या लाडज जुनी हे गाव पुराने पुर्णतः वेढले असून गावातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. तर गावाला लागुनच असलेली दरड पुरामुळे काही प्रमाणात कोसळली आहे. तसेच दरडीवर काही घरे असून दरड कोसळण्याने घरेसुध्दा कोसळण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. पुरजन्य परिस्थितीने या गावाचा तालुक्यातशी संपर्क तुटला असून यापुर्वी ऑगस्ट २०२० मध्ये महापुर आला होता. त्यावेळी गावातील अनेकांना स्थलांतरीत करण्यात आले होते. तसेच मागील माहिण्यात सुध्दा अशाचप्रकारे पुर आला होता. पुरामुळे संपुर्ण शेतशिवार पाण्याखाली आले असुन अतोनात नुकसान झाले आहे. तर काहींच्या घराचीही पडझड झाल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु अदयापर्यंत शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
मागाील कित्येक वर्षापासून लाडज गावाचे पुनर्वसन करण्यात यावे म्हणून शासन दरबारी गावकरी कागणी करीत आहे. परंतु याकडे शासन पुर्णत: दुर्लक्ष करीत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तेव्हा सर्व परिस्थिती लक्षात घेता गावाचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी गावाकऱ्यांतून पुन्हा एकदा करण्यात येत आहे. तसेच झालेल्या नुकसानीची पूर ओसरल्यानंतर लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीही गावकरी करीत आहे.
गोसीखुर्द धरणाचे ३३ पैकी २३ गेट २.५० मी. ने व १० गेट २.० मी. ने उघडलेले असुन विसर्ग ५,२३,५४४ क्युसेक्स (१४,८२५ क्युमेक्स) एवढा आहे.
#चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले #ब्रम्हपुरी तालुक्यातील #लाडज गाव पुराने वेढले…
-जनजीवन विस्कळीत, #गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने #वैनगंगा #नदी फुगली, पुराने अनेक गावांत पाणी#Flood #chandrpur #bhramhpuri #ladaj pic.twitter.com/rvlsHpV9nw— THE GADVISHVA (@gadvishva) August 17, 2022