The गडविश्व
गडचिरोली, १८ सप्टेंबर : जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आयोजित शिबिरांच्या माध्यमातून एकूण ५० रुग्णांनी उपचार घेत व्यसनमुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
धानोरा तालुक्यातील बेलगाव येथील शिबिरात १२ रुग्णांनी नोंदणी करून पुर्ण उपचार घेतला. रुग्णांची नोंदणी राहुल महाकुळकर यांनी केली. शिबिराचे नियोजन भास्कर कड्यामी यांनी केले. यशस्वीतेसाठी पोलीस पाटील संतोष मलिया, उपसरपंच मथनुराम मलीया, गंभीरशहा मडावी, गाव पुजारी छावनशहा मडावी यांनी सहकार्य केले. आंबेशिवनी येथील शिबिराचा एकूण २० रुग्णांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे नियोजन तालुका संघटक अमोल वाकुडकर यांनी केले. रुग्णांची नोंदणी स्वीटी आकरे यांनी केली. हा उपक्रमाला उपसंघटक रेवनाथ मेश्राम, गाव संघटनेच्या सदस्य देवेंद्र भैसारे, विठाल बोरूले, सरिता टेंभुर्णी यांनी सहकार्य केले. चामोर्शी तालुक्यातील पावीलसनपेठ येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातून १८ रुग्णानी पूर्णवेळ उपचार घेतला. रुग्णांची नोंदणी आनंद सिडाम, सोनी सहारे यांनी केली.
बेलगाव, आंबेशिवनी व पावीलसनपेठ याठिकाणी आयोजित गाव पातळी शिबिराच्या माध्यमातून एकूण ५० रुग्णांवर उपचार करण्यात आले. तिन्ही शिबिरांमध्ये रुग्णांना दारूचे दुष्परिणाम पटवून देत प्राजक्ता मेश्राम यांनी केस हिश्त्री घेतली. तसेच छत्रपती घवघवे यांनी धोक्याचे घटक, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आदींची माहिती देत समुपदेश केले.