The गडविश्व
गडचिरोली : गाव संघटनेच्या मागणीनुसार एटापल्ली तालुक्यातील गेंदा व कोरची तालुक्यातील बेलगांवघाट येथे गाव पातळी व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून ३३ जणांनी व्यसनातून मुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
गेंदा येथील गावपातळी व्यसन उपचार शिक्षण क्लिनिकमध्ये १५ रुग्णांनी उपचार घेतला.रुग्णांची केस हिस्ट्री संयोजक छत्रपती घवघवे यांनी घेतली तर रुग्णांचे समुपदेशन पूजा येलूरकरयांनी केले. गाव क्लिनिकचे नियोजन व व्यवस्थापन तालुका संघटक किशोर मलेवार व तालुका प्रेरक रवींद्र वैरागडे यांनी केले. यशस्वीतेसाठी सरपंच रीना कुळहेटी, उपसरपंच दसरू मटामी, सदस्य रमेश वैरागडे, आशा वर्कर दीपिका सुरजागडे, मुख्याध्यापक जी.जे. येरकर, अजय पदा यांनी सहकार्य केले. बेलगांवघाट येथील शिबिरात १९ रुग्णांनी नोंदणी केली तर १८ रुग्णांनी पुर्णवेळ उपचार घेतला. दरम्यान पंचायत समिती सदस्य सदाराम नुरुटी यांनी शिबिराला भेट दिली. संयोजक प्रभाकर केळझरकर यांनी रुग्णांना धोक्याचे घटक सांगत केस हिष्ट्री घेतली तर प्राजु गायकवाड यांनी रुग्णांचे समुपदेशन केले. शिबिराचे नियोजन तालुका संघटिका निळा किन्नाके यांनी केले. यशस्वीतेसाठी गाव संघटनेचे अध्यक्षा रसिका गावतुरे, पोलिस पाटील सुरेखा सहारे, आरोग्य सेविका कमल मोहुर्ले यांनी सहकार्य केले.