– मुक्तिपथ तालुका कार्यालयात क्लिनिक
The गडविश्व
गडचिरोली, २३ सप्टेंबर : जिल्ह्यातील गडचिरोली, एटापल्ली, चामोर्शी, अहेरी येथील मुक्तिपथ तालुका कार्यालयात नियोजित दिवशी आयोजित क्लिनिकला एकूण 48 रुग्णांनी भेट दिली. यामाध्यमातून उपचार घेत व्यसनमुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दारूमुक्त होण्याची इच्छा असलेल्या रुग्णाना उपचार मिळावे यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे नियोजित दिवशी तालुका मुख्यालयी क्लिनिकचे आयोजन केले जाते. सोमवारी गडचिरोली 6, गुरुवारी एटापल्ली 15, शुक्रवार चामोर्शी 11, अहेरी 16 रुग्णांनी भेट देत पूर्ण उपचार घेतला. अशा एकूण 48 रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा निर्धार केला आहे.
क्लिनिकला येणाऱ्या रुग्णांना दारूमुक्त होण्यासाठी मदत मिळावी यासाठी औषोधोपचारासह समुपदेशन देखील करण्यात येते. क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती देत समुपदेशन करण्यात आले. रुग्णांची केस हिष्ट्री घेत दारूचे दुष्परिणाम सांगितले.