-सीताराम मडावी यांचे प्रतिपादन
The गडविश्व
गडचिरोली, १४ नोव्हेंबर : आदिवासी समाजाने व्यसनापासून दूर राहून आपला विकास साधावा. आपण निर्व्यसनी तर गाव व्यसनमुक्त होणार असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सीताराम मडावी यांनी केले.
भामरागड तालुक्यातील जीजगाव येथे व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी राजेश तलांडी, मनोज पोरतेट, अशोक यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
या शिबिराच्या माध्यमातून एकूण १५ रुग्णांवर पूर्ण उपचार करण्यात आला. साईनाथ मोहूर्ले यांनी रुग्णांना समुपदेशन केले. दारूची सवय कशी लागते, शरिरावर कोणते दुष्परिणाम दिसून येतात, नियमित उपचार घेणे आदींबाबत सांगितले. संयोजिका पूजा येल्लूरकर यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेतली. सोबतच धोक्याचे घटक व दारूचे दुष्परिणाम पटवून दिले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी गावातील नागरिकांनी सहकार्य केले. शिबिराचे नियोजन आबिद शेख व विद्या पुंगाटी यांनी केले.
