The गडविश्व
सावली : तालुक्यातील व्याहाड बुज. येथे पाणी हे जीवन आहे या उदात्त हेतूने काँग्रेस चे कार्यकर्ते अनिल गुरनूले यांनी पाणपोई उभारून जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पाणपोईचे उदघाटन केले.
तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून व्याहाड बुज. ची ओळख आहे. सध्या सूर्य आग ओकत असल्याने उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. ग्रामीण भागातील प्रवाशी, वाटसरु यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी. या मुख्य उद्देश समोर ठेऊन व्याहाड बुज. येथील कॉंग्रेस चे कार्यकर्ते अनिल गुरनूले यांनी पाणपोई ची उभारणी केली.
उद्घाटनाप्रसंगी दिनेश चीटनूरवार, तालुका अध्यक्ष नितीन गोहणे, सुनील बोमनवार, मेहबूब पठाण, संजय चांदेकर, सचिन इंगुलवार, जयंत संगीडवार, पितांबर वासेकर, दीपक गद्येवार, संघपाल भगत, लालाजी म्हशाखेत्री, भाऊराव चौधरी, कवडु ठाकूर आणि ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.