The गडविश्व
गडचिरोली : कुरंडीमाल येथील शासकीय आश्रम शाळेतील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याकरीता निरोप संमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कुमरे, प्रमुख अतिथी म्हणून कुरंडीमालच्या सरपंचा सौ. शारदाताई मडावी, माजी सरपंचा टिकेशजी कुमरे, नंदकिशोर मसराम, पोलीस पाटील उषाताई नैताम, तंमुस अध्यक्ष निायक मडावी व प्रणालीताई ढवळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बी.एस.जाधव यांनी केले. या कार्यक्रमात नंदकिशोर मसराम यांनी विद्यार्थ्यांना उपयोजनात्मक शिक्षण व मुल्यशिक्षणाचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक शेंडे यांनी केले तर आभार पाटणकर यांनी मानले.
स्वागतगीत कला शिक्षक करकाडे व चमु यांनी सादर केले. कार्यक्रमाला अधिक्षक चिवंडे, अधिक्षीका कु. जवंजाळ, भाकरे, धात्रक व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली.